वसईतील नाल्यांना पर्णवेलीचा विळखा

वसईतील नाल्यांना पर्णवेलीचा विळखा
Published on

नाल्यांना पर्णवेलींचा विळखा
वसईकरांना माॅन्सूनपूर्व कामाची प्रतीक्षा
वसई, ता. १५ (बातमीदार)ः शहरात पावसाळीपूर्व नियोजनाच्या हालचाली सुरू आहेत. आयुक्त, महापौरांनी तातडीने पाहणी, बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, वसईतील नाल्यांना पर्णवेलीचा विळखा घट्ट बसला असून, १५ एप्रिल उजाडला असताना सुटणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
वसई-विरार शहरात १८७ किलोमीटर लांबीचे १५० नाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी साचते. इमारतीचे तळमजले पाण्याखाली येतात. त्यामुळे जलमय स्थितीला सामोरे जावे लागते. अशातच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे निर्देश आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यांनी परिसरात पाहणी केली. पावसाच्या आगमनाला दीड महिना उरला असताना वसईच्या खाडीला लागून असणाऱ्या नाल्यात पर्णवेलीचे जाळे फोफावत आहे. त्यामुळे यंदा वसईची तुंबई होणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
---------------
डासांचा प्रादुर्भाव
पर्णवेलीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून औषध, धूर फवारणी होते. मात्र, डासांची उत्पत्ती झपाट्याने होत असल्याने नाले स्वच्छतेची मागणी होत आहे.
---------------
वसई पश्चिमेतील अनेक भाग पावसाळ्यात पाण्याखाली येतात. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने नाल्यातील पर्णवेली हटवण्याचे काम सुरू करावे.
-नारायण मानकर, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com