

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : कल्याणमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवाद्याशी संबंध असल्याची भीती दाखवत पाच जणांच्या टोळीने ८२ वर्षीय आजीची तब्बल ७३ लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमएफसी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कुलकर्णी या कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील सिंडीकेट परिसरात राहतात. ६ एप्रिलला विजय खन्ना असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या आणखी चार साथीदारांनी स्वतःला तपास अधिकारी असल्याचे भासवत आजींना संपर्क करून धमकावले. व्हॉट्सॲपद्वारे विविध बँक खात्यांचे तपशील पाठवून त्या खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. ६ ते १० एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण ७३ लाख ३० हजार रुपये संशयितांनी स्वतःच्या खात्यांवर वळते करून घेतले. हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर आजींना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा दावा
या सायबर गुन्हेगारांनी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मोबाईलमध्ये तुमचा क्रमांक आढळला आहे. त्याने केलेल्या बेनामी व्यवहारांमध्ये तुमचाही सहभाग असल्याचा संशय असल्याचे सांगून आजींना घाबरवले. तुमच्या बँक व्यवहारांची चौकशी करावी लागेल, असे सांगत संशयितांनी आजींना विश्वासात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.