गटारातील गाळ रस्त्यावरच; नागरिक हैराण

गटारातील गाळ रस्त्यावरच; नागरिक हैराण
Published on

गटारातील गाळ रस्त्यावरच; नागरिक हैराण
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेतील खैराणी रोड परिसरातील वजनकाट्याजवळ काही दिवसांपूर्वी पालिकेकडून नालेसफाई करण्यात आली. या वेळी काढण्यात आलेला केमिकलमिश्रित गाळ आणि इतर कचरा रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी साचून ठेवण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
महापालिकेच्या नियमांनुसार नालेसफाईतून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, अनेक दिवस उलटूनही हा राडारोडा उचलण्यात आलेला नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहने उभी राहत असल्याने पार्किंगदरम्यान हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. परिणामी दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच साचलेल्या गाळामुळे मच्छरांची उत्पत्ती वाढून डेंगी, मलेरिया, हिवताप यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने हा राडारोडा उचलून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com