आग प्रकरणात अद्याप गुन्हा नाही

आग प्रकरणात अद्याप गुन्हा नाही
Published on

आग प्रकरणात संथ गतीने कारवाई
घटनेच्या पाच दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक परिसरातील झोपड्यांना लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या पाच दिवसानंतरही कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
इंद्रलोक परिसरात खासगी भूखंडावर कांदळवनावर बांधलेल्या झोपड्यांमधील तिघांचा शुक्रवारी लागलेल्या आगीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. तसेच चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते, परंतु दुर्घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे, घटनेच्या दुसऱ्या दिवशी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी बेकायदा झोपड्या बांधणाऱ्या गुप्ता नामक व्यक्तीचे नावही त्यांनी घोषित केले. तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही.
----------------------
अहवालाची प्रतीक्षा
नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धीरज कोळी यांनी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अहवाल मिळाल्यानंतर कार्यवाही होईल, असा खुलासा केला आहे. तर आगीचा अहवाल आजच पोलिसांकडे पाठवण्यात येईल, असे महापालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com