भटक्या श्वानांबाबत तात्काळ उपाययोजना करा

भटक्या श्वानांबाबत तात्काळ उपाययोजना करा
Published on

भटक्या श्वानांबाबत तत्काळ उपाययोजना करा
नगरसेवक आशीष वर्तक यांची महापौरांकडे मागणी
वसई, ता. १५ (बातमीदार) : वसई़-विरार शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वसईचे नगरसेवक आशीष वर्तक यांनी महापौर अजीव पाटील व प्रशासनाकडे केली आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना याचा अधिक धोका असून, अनेक वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील धोकादायक बनले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या श्वानांना तातडीने पकडणे व त्यांचे निर्बीजीकरण करणे. पिसाळलेल्या (रॅबीजग्रस्त) श्वानांची तत्काळ ओळख करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई, सर्व भटक्या श्वानांचे लसीकरण मोहीम राबविणे, तक्रारींसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करणे, अशी मागणी नगरसेवक आशीष वर्तक यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com