.. तर कल्याण-शिळ मार्गावरील कोंडी कमी होणार

.. तर कल्याण-शिळ मार्गावरील कोंडी कमी होणार
Published on

..तर कल्याण-शिळ मार्गावरील कोंडी कमी होणार

नगरसेविका वेदिका पाटील यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १५ : कल्याण-शिळ मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पडले ते खर्डी तावशी रस्ता तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याची मागणी भाजप नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी केली आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास कल्याणफाटा आणि शिळफाटा परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होईल, असा दावा त्यांनी केला.

प्रभाग क्रमांक २९ मधील विकासकामांबाबत बोलताना पाटील यांनी विकास आराखड्यातील (डीपी) अनेक रस्ते मंजूर होऊनही प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचे नमूद केले. पडले ते खर्डी गावादरम्यानचा तावशी रस्ता हा त्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून, तब्बल १० वर्षांपासून तो रखडलेला आहे. स्वतः कॉलेजला जाताना त्या या रस्त्याचा वापर करत होत्या. मात्र १० वर्षे उलटूनही रस्ता अपूर्णच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आता नगरसेविका म्हणून हा रस्ता तातडीने पूर्णत्वास न्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. हा रस्ता सुरू झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन कल्याण-शिळ मार्गावरील ताण कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच दिवा-साबे गावासाठी शिळ-दिवा मुख्य रस्ता, प्रशांतनगरमार्गे साबेगाव असा पर्यायी मार्ग विकसित करण्याची मागणीही त्यांनी केली. यामुळे स्थानिक नागरिकांना सोईस्कर प्रवासाचा पर्याय मिळेल तसेच मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी आटोक्यात येईल, असे त्या म्हणाल्या. प्रभागातील वाढती लोकसंख्या आणि जलदगतीने उभारली जाणारी गृहसंकुले लक्षात घेता मूलभूत सुविधांवरही त्यांनी भर दिला. पाणीटंचाई सोडवण्यासाठी नवीन जलकुंभ उभारून जलवाहिन्यांचे जाळे मजबूत करावे, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रात अनेक शाळांमध्ये आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मशीन उपलब्ध करून देणे तसेच डायघर व खर्डी येथील शाळा दहावीपर्यंत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
महिला सुरक्षेसाठी गावोगावी पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय जीर्ण अवस्थेतील स्मशानभूमींची दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करणे आणि प्रसूती रुग्णालय उभारणे यांसारख्या मागण्याही त्यांनी मांडल्या. तावशी रस्त्याचे काम तातडीने सुरू करून तो वाहतुकीसाठी खुला केल्यास कल्याण-शिळ मार्गावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com