

बेलापूरमध्ये माकपकडून आंबेडकर-फुले अभिवादन सभा
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. आग्रोळी येथील बी. टी. रणदिवे ग्रंथालयात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्यायाच्या लढ्याची आजही तितकीच गरज असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.
प्रमुख वक्त्या प्रा. वंदना सोनाळकर यांनी फुले द्विजन्मशताब्दी वर्ष व महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनंतरही समाजात विषमता कायम असल्याचे नमूद केले. फुले-आंबेडकरांच्या विचारांचे आजच्या काळात वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी त्रिशीला कांबळे होत्या. कॉ. के. के. प्रकाशन यांनी जागतिक घडामोडींचा संदर्भ देत भारतासमोरील आव्हानांवर भाष्य केले. कार्यक्रमाची सुरुवात विजय खरात यांच्या भीमगीताने झाली. प्रास्ताविक रेखा देशपांडे यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सामाजिक समता व न्यायासाठी एकत्रित लढ्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.