तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

तरुणाकडून गावठी कट्टा जप्त
Published on

तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

ठाणे : वर्तक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री गस्तीदरम्यान संशयित हालचाली करणाऱ्या पोखरण रोड नंबर २ येथील कोकणी पाड्यात राहणाऱ्या प्रणव प्रभाकर माळी (वय २२) या तरुणाला गावठी कट्टा व जिवंत काडतूससह जेरबंद केले. त्याच्याकडून ते अग्निशस्त्र जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (ता. १२) मध्यरात्री १२:४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वर्तकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मेघराज जाधव व त्यांच्या तपास पथकाला बिरसा मुंडा चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ एक इसम संशयितरित्या बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा तसेच जीन्सच्या खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. यानंतर त्याला ताब्यात घेऊन वर्तक नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी आर्म ॲक्ट कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली अशी माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास वर्तकनगर पोलिसांमार्फत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com