डीबाटूंच्या कुलगुरूंनी सिनेस्टाईलने मारली पुणे केंद्रात धाड

डीबाटूंच्या कुलगुरूंनी  सिनेस्टाईलने  मारली  पुणे केंद्रात धाड
Published on

विद्यार्थ्यांच्या रांगेत ‘डीबाटू’चे कुलगुरू!

पुणे केंद्रात ओळख लपवून विद्यार्थ्यांशी संवाद; सोयीसुविधांची पाहणी

मुंबई, ता. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी बुधवारी (ता. १५) पुणे केंद्रात पूर्वसूचना न देता भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. कामत यांनी आपली ओळख उघड न करता सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे रांगेत उभे राहून विद्यार्थ्यांशी थेट व मोकळा संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी माेकळेपणाने आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर त्यांनी उणिवांबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारून तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.


परीक्षाविषयक तक्रारी हाताळण्यात होणारा अनावश्यक विलंब, उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया वेळेत न होणे, तक्रारींवर कारवाई न होणे या बाबी विद्यार्थ्यांनी मांडल्या. केंद्राच्या भौतिक सुविधांबाबतही विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय याकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. या वेळी अनेक वर्षांपासून निकाली न काढलेल्या उत्तरपत्रिकांचे ढीग केंद्रातील जागा व्यापत असल्याची धक्कादायक बाबही त्यांच्या निदर्शनास आली. सुमारे अर्धा दिवस केंद्रावर उपस्थित राहून डॉ. कामत यांनी विविध विभागांना आवश्यक त्या सुधारणांचे सविस्तर निर्देश दिले आणि ठरावीक कालमर्यादेत त्यांची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलगुरूंच्या या कृतीचे स्वागत करून संवेदनशील व जबाबदार नेतृत्वाबद्दल समाधान व्यक्त केले.

माहिती घेतल्यानंतर दिली ओळख
पुरेशी व सखोल माहिती संकलित केल्यानंतर डॉ. रजनीश कामत यांनी आपली अधिकृत ओळख उघड केली. त्यानंतर त्यांनी केंद्राचे विभागवार संपूर्ण निरीक्षण केले. स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विद्यार्थी तक्रार निवारण यंत्रणेची परिणामकारकता आणि उत्तरपत्रिकांचे सुव्यवस्थित व्यवस्थापन या सर्व बाबींमधील उणिवांबद्दल त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com