गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरण

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरण
Published on

आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
मुंबई, ता. १५ ः गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रात झालेल्या कॉन्‍सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी कॉन्सर्टच्या आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी वनराई पोलिसांकडे केली. नेस्कोसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी अमली पदार्थांचा उघडपणे वापर होतो. कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्यांची कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. याचा अर्थ आयोजकांनी सुरक्षितेचे नियम धाब्यावर बसविले होते. कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता सभागृह भाड्याने देणाऱ्या मालकासह, अमली पदार्थांचा पुरवठादार, आयोजकांवरही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी, नेस्को केंद्रात स्वतंत्र पोलिस चौकी व गुप्तहेर यंत्रणेची तरतूद करावी, असे पेडणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com