‘जय भीम’च्या घोषणांनी बदलापूर दुमदुमला

‘जय भीम’च्या घोषणांनी बदलापूर दुमदुमला
Published on

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त बदलापूर पश्चिमेतील बेलवली परिसरात सायंकाळी काढलेल्या मिरवणुकीत हजारो भीम अनुयायांनी सहभाग घेतला. या वेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या वतीने २५ किलो लाडूंचे वाटप केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि निळ्या रंगाच्या पोशाखात सजलेल्या अनुयायांमुळे संपूर्ण मिरवणूक आकर्षक ठरली.
लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत सामाजिक एकात्मता आणि समतेचा संदेश दिला. अनेकांनी निळे फेटे बांधून बाबासाहेबांप्रती अभिमान व्यक्त केला. मिरवणुकीदरम्यान सहभागी नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिण्याच्या पाण्याची तसेच लाडूंची व्यवस्था करण्यात आली होती. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा विशेष ठरली. विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर भीमगीतांनी वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमाला अविनाश देशमुख, राजेश वानखेडे, गणेश ढोके, प्रविण केदारे, भीमराव खडसे, बंडू जाधव, उत्तमराव वानखेडे, हिवराळे यांच्यासह जेष्ठ पत्रकार संजय साळुंके आणि प्रशांत कनोजे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com