

आपल्या जीवापेक्षा काही महत्त्वाचे नाही. अनधिकृत वाहनाने प्रवास करू नका आणि आपला जीव धोक्यात घालू नका, असा सल्ला मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मुरबाड तालुक्यातील नागरिकांना दिला आहे.
कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील प्रवासी वाहतूक व अपघात नियंत्रणाबाबत तत्काळ उपाययोजना करण्यात यावा, या मागणीसाठी मुरबाडमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार देशमुख यांची बुधवारी (ता. १५) भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात मुरबाड तालुका कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे, सरचिटणीस अरविंद विशे, प्रकाश पवार, संतोष पवार, दिलीप पवार, ज्योती गोडांबे, बबलू मडके आदी उपस्थित होते.
मुरबाड-कल्याण-मुरबाड मार्गावर पुरेशा एसटी बसगाड्या मिळत नसल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव काळ्या-पिवळ्या जीपमधून प्रवास करावा लागतो. त्यासाठी राज्य परिवहन मंडळाचे मुरबाड आगार व्यवस्थापक व ठाणे विभाग नियंत्रकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, बसची फेऱ्यांची संख्या वाढवावी, खासगी प्रवासी वाहतुकीवर कठोर नियंत्रण ठेवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घालावी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अपघातग्रस्त ठिकाणी वेग मर्यादा सिग्नल व सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्यात यावी, वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. तहसीलदार कार्यालयातील मृत कर्मचारी भूषण घोरपडे व अन्य प्रवाशांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.