

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भिवंडीत मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. या मिरवणुकीत १५ हजारांहून अधिक भीमसैनिकांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत जल्लोष साजरा केला.
धामणकर नाका चौकातून सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते रथावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. मिरवणुकीत विद्युत रोषणाई व फुलांनी सजवलेल्या ट्रक, टेम्पो व रथांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. ढोल-ताशा, वाजंत्री, फटाक्यांची आतिषबाजी; तसेच डीजेच्या तालावर भीमसैनिक व महिलांनी नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला. विविध सामाजिक संस्था व मंडळांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले.
यावेळी संविधान, शिक्षण, पाणी बचत आणि स्वच्छता यांसारख्या विषयांवर जनजागृती करणारे फलक मिरवणुकीतून प्रदर्शित करण्यात आले. कणेरी, गौरीपाडा, रोशनबाग, प्रभुआळी, मंडई, तीनबत्ती, कोटरगेट मशिद या मार्गे निघालेली ही मिरवणूक मध्यरात्रीच्या सुमारास भिवंडी महानगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात समारोपास पोहोचली. मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.