एक मेपासून १० टक्के पाणीकपात?

एक मेपासून १० टक्के पाणीकपात?
Published on

१ मेपासून १० टक्के पाणीकपात?
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : ‘एल-निनो’मुळे यंदा कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच जाहीर केला. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी येत्या १ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, तुळशी व विहार या सात जलाशयांतून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यात वाढत्या उष्णतेमुळे जलाशयांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी नियोजनाचा भाग म्हणून येत्या १ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. ही मंजुरी मिळताच, पाणीकपात लागू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
३३.६० टक्के पाणी शिल्लक
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा असून, तो ७ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. दरवर्षी मॉन्सूनचा अंदाज लक्षात घेऊन जुलैपर्यंत पाणी नियोजन केले जाते; मात्र, यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे राज्य सरकारने ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे १ मेपासून १० टक्के कपात केल्यासच ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--
जलसाठा (दशलक्ष लिटर/१५ एप्रिल रोजी)
अप्पर वैतरणा - ७७,०४५
मोडक सागर - ४५,३४०
तानसा - ४०, ८१७
मध्य वैतरणा - ६९,१०६
भातसा - २,३५,४३९
विहार - १५,३५३
तुळशी - ३,२७४
--
तीन वर्षांतील जलसाठा
वर्ष - जलसाठा- टक्केवारी
२०२६ - ४,८६,३७५ - ३३.६०%
२०२५ - ४,३७,७२८ - ३०.२४%
२०२४ - ३,५५,१७७ - २४.५४%
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com