

आयआयटी मुंबईत
‘क्वांटम फॅब्रिकेशन’
ॲड. आशीष शेलार यांची माहिती
मुंबई, ता. १५ : राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी महाराष्ट्र सरकारनेही या क्षेत्रात पुढाकार घेऊन ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले आहे. याद्वारे उद्योगसिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईत येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी दिली.
जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगून महाराष्ट्राला २०३० पर्यंत या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही कंपन्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर हॅकप्रूफ क्वांटम कम्युनिकेशनमध्ये यश मिळवले असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, आयशर पुणेचे प्रो. उमाकांत रासोल, आयबीएम इंडियाचे संचालक अमित सिंघी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच मंत्रालयातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.