

डाॅ. प्रदीप कुरूलकरचा जामीन अर्ज फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : शत्रूराष्ट्र पाकिस्तानला देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली जवळपास तीन वर्षांपासून अटकेत असलेला ‘डीआरडीओ’चा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर याची जामिनासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १५) फेटाळून लावली.
कुरूलकर महत्त्वाच्या पदावर होता आणि त्याने पाकिस्तानी गुप्तहेराला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती दिली होती. कुरूलकर सध्या सेवानिवृत्त असून, काही साक्षीदार हे त्याचे कनिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे कुरूलकर त्यांना धमकावून पाकिस्तानी गुप्तहेराशी संपर्क साधून फरारी होऊ शकतो, असे निरीक्षणही न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने याचिका फेटाळताना नोंदवले.
सविस्तर सुनावणीनंतर कुरूलकर याच्या याचिकेवरील निर्णय न्या. डिगे यांच्या एकलपीठाने राखून ठेवला होता. तो बुधवारी जाहीर करून कुरूलकर याची जामिनाची मागणी फेटाळून लावली. राज्य दहशतवादी पथकाने (एटीएस) कुरूलकर याला २०२३मध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याने जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला हाेता. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.