शिवसेना गावागावात पोहोचवा संघटनात्मक बांधणी मजबूत करा - खासदार श्रीकांत शिंदे

शिवसेना गावागावात पोहोचवा संघटनात्मक बांधणी मजबूत करा - खासदार श्रीकांत शिंदे
Published on

शिवसेना गावागावात पोहोचवा : खासदार श्रीकांत शिंदे

पालघर, ता. १६ (बातमीदार) : नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसेनेच्या संघनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बंधन गार्डन अल्याळी, पालघर येथे पार पडली. याप्रसंगी शिवसेनेचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे यांनी यापुढे पालघर जिल्ह्यात गावागावात पक्ष संघटना अजून मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले, की महाराष्ट्रासह पालघरमधील जनतेनेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला असून बीएल नेमणुका पूर्ण करून रिक्त असलेल्या पक्ष संघटनात्मक नियुक्त्याही लवकरात लवकर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बुधवारी (ता. १५) श्रीकांत शिंदे हे पालघरच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पालघर लोकसभा क्षेत्रातील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम हेही उपस्थित होते.

या बैठकीला विभागीय आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, भाई खाडे, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, वसंत चव्हाण, नीलेश तेंडुलकर, नगराध्यक्ष उत्तम घरत, राजेंद्र माच्छी, उपनेते ज्योती मेहेर, जगदीश धोडी, केदार काळे, वैदेही वाढाण यासह जिल्हा तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com