

संघर्षातून घडलेला यशस्वी प्रवास
गौरव पंढरीनाथ पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी
वाणगाव, ता. १६ (बातमीदार) : डहाणू शहराचे सुपुत्र गौरव पंढरीनाथ पाटील यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरती (एमपीएससी) प्रक्रियेतून नगररचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत नगररचना सहाय्यक (क्लास २) अधिकारी पदावर निवड मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामुळे डहाणू परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य कुटुंबातून येत असताना अनेक अडचणींवर मात करत, गौरव यांनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात सातत्य राखले. आर्थिक व सामाजिक मर्यादा असतानाही त्यांनी हार न मानता आपले ध्येय निश्चित ठेवले आणि त्यासाठी कठोर मेहनत घेतली. या संघर्षमय प्रवासातून त्यांनी आज हे यश मिळवले आहे. गौरव पाटील यांच्या यशामागे त्यांचे वडील पंढरीनाथ पाटील व मार्गदर्शक शिक्षक, स्वतःची जिद्द आणि डहाणू येथील वाचनालयाची सुविधा या जोरावर ही कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. डहाणूचे आमदार विनोद निकोले, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, प्रा. एकनाथ पाटील व डहाणूकर ग्रामस्थांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने त्यांनी पुढेही प्रामाणिकपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.