वसईचा कांदा बाजारात

वसईचा कांदा बाजारात
Published on

वसईचा सफेद कांदा बाजारात दाखल

विरार, ता. १६ (बातमीदार) : औषधी गुणधर्म म्हणून ओळख असलेल्या वसईचा सफेद कांदा बाजारात दाखल झाला आहे. सध्या या कांद्याच्या एका माळेला अडीचशे रुपये किंमत मोजावी लागत आहे.

तसे पाहता, वसईच्या पश्चिम पट्ट्यात सफेद कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती, परंतु आता जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने काही गावांमध्येच या कांद्याची लागवड केली जात आहे. या कांद्याची लागवड पूर्वी कळंब, अर्नाळा, रानगाव व निर्मळ या भागांमध्ये होत असे, परंतु आता मात्र अनेक कारणांनी कांद्याची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे हा कांदा आता फक्त भुईगाव व गास या गावातच पिकवला जात आहे. चवीला किंचितसा गोड व औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. कांद्याच्या एका माळेत लहान व मोठे असे साडे तीन ते चार किलो कांदे असतात. सध्या स्वतः शेतकरीच हा कांदा विकत असून, २४० ते २५० रुपयापर्यंत एक माळ विकली जात आहे. तसेच यंदा उत्पादन कमी असल्याने हा कांदा येत्या १५ दिवसांत विकला जाईल, असे मत कांदाविक्रेता दत्ता पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com