

मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ व्या ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई झोन अंतर्गत राजीव गांधी स्टेडियम, बेलापूर येथे १७ ते १९ एप्रिल रोजी करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुंबईतील सेवादल क्षेत्र एक ते सात, डोंबिवली, वसई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, खरसई (रायगड), नागपूर, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, चिपळूण आणि गोवा येथील एकूण २१ निवडक संघ सहभागी होत आहे. मंडळाच्या नेरुळ सेक्टरचे संयोजक वसंत गोड यांनी माहिती देताना सांगितले, की या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा, मेंबर इंचार्ज (वित्त व लेखा) जोगिंदर मनचंदा तसेच मेंबर इंचार्ज (प्रचार-प्रसार) मनमोहन छाबडा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहतील. याशिवाय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची उपस्थितीही या सोहळ्याला अधिक विशेष बनवेल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.