

ठाणे दोन थोडक्यात बातम्या
अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे : बाजारात जाते सांगून गेलेली १७ वर्षीय मुलगी ठाण्यातील सावरकरनगर येथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर मुलीचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून, ती १ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिला मूळ गावी जयपूर येथे शोधल्यानंतर, ती तेथे सापडली नसल्याने वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
............
मेडोज सर्कल येथून दुचाकी चोरीला
ठाणे : दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर मेडोज सर्कल येथे पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आदित्य यादव (२१) या तरुणाने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार मागील बुधवारी (ता. ८) घडला असून, चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत ३० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.