

खालापुरात महावितरणाचा अजब कारभार
वृक्षतोडीनंतर फांद्या गटारात ः सांडपाणी निचरा होण्यास अडचण
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः शहरात महावितरणकडून मॉन्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे, परंतु विद्युतवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे कापल्यानंतर, त्यांच्या मोठमोठ्या फांद्या आणि पालापाचोळा उघड्या गटारात टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळापूर्वी खालापूर महावितरण कार्यालयाकडून शहरातील विद्युत वाहक तारांना अडथळा निर्माण होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम ठेकेदारी पद्धतीवर देण्यात येते. यंदादेखील फांद्या छाटणीचे काम खालापूर शहरात सुरू झाले आहे, परंतु फांद्याच्या छाटणीनंतर त्या हटवण्याची तसदी ठेकेदाराचे कामगार घेत नसल्याने ठिकठिकाणी पालापाचोळा जमा झाला आहे. काही ठिकाणी फांद्या गटारात टाकण्यात आल्या आहेत. यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. ठेकेदाराने फांद्या छाटणीनंतर त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची देखील जबाबदारी घेतली पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महावितरण खालापूरचे अभियंता प्रवीण शेडगे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असता याबाबत नगरपंचायतीला सूचना देऊन फांद्या हटवण्याची व्यवस्था करू, असे त्यांनी सांगितले.
फोटो ओळ
खालापूर ः झाडाच्या फांद्या छाटणी केल्यानंतर गटारात टाकण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.