पनवेल महानगरपालिकेत जनगणना २०२७ प्रशिक्षणांतर्गत फील्ड ट्रेनर्सची क्षेत्रभेट

पनवेल महानगरपालिकेत जनगणना २०२७ प्रशिक्षणांतर्गत फील्ड ट्रेनर्सची क्षेत्रभेट
Published on

पनवेलमध्ये डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा
प्रशिक्षणांतर्गत ४५ फिल्ड ट्रेनर्सनी घेतली क्षेत्रभेट
पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेमार्फत ‘जनगणना २०२७’ च्या तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून फिल्ड ट्रेनर्सची क्षेत्रभेट बुधवारी (ता. १५) पार पडली. या उपक्रमांतर्गत ४५ प्रशिक्षणार्थ्यांनी वाल्मिकीनगर परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन जनगणनेच्या तांत्रिक प्रक्रियेचा अनुभव घेतला. ही क्षेत्रभेट आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जनगणना उपायुक्त अभिषेक पराडकर यांच्या नियोजनानुसार झाली. या क्षेत्रभेटीच्या वेळी सांख्यिकी अधिकारी तथा जनगणना विभागप्रमुख रविना येवले व अधीक्षक नामदेव पिचड हे उपस्थित होते.
क्षेत्रभेट काळण समाज हॉल, वाल्मिकीनगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनगणना विभागप्रमुख व अधीक्षकांनी सर्व फिल्ड ट्रेनर्सना मार्गदर्शन केले. त्यांनी जनगणना कार्यातील अचूकता, जबाबदारी व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. क्षेत्रभेटीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४५ फिल्ड ट्रेनर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या वेळी ६० कुटुंबाचे प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी फिल्डवरील विविध परिस्थिती हाताळण्याचे तंत्र, नागरिकांशी संवाद कौशल्ये आणि तांत्रिक अडचणींचे निराकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्व फिल्ड ट्रेनर्सनी मोबाईल ॲपद्वारे प्रत्यक्ष डेटा एन्ट्री करून अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी फिल्ड ट्रेनर वैभव पाटील यांनी सर्व फिल्ड ट्रेनर्स, अधिकारीवर्ग व वाल्मिकी नगर वसाहतीतील नागरिकांचे आभार मानले.

डिजिटल जनगणनेचे प्रात्यक्षिक
जनगणना २०२७ ही पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे या क्षेत्रभेटीत मोबाईल ॲपच्या माध्यमातून डेटा संकलन, घरयादी तयार करणे, माहितीची अचूक नोंदणी व पडताळणी यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन घरांची माहिती नोंदविण्याचा सराव केला.

या क्षेत्रभेटीमुळे फिल्ड ट्रेनर्स अधिक आत्मविश्वासाने व सक्षमतेने पुढील टप्प्यात पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाले आहेत. जनगणना २०२७ च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- अभिषेक पराडकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com