

पोयनाड विभागात अखंड नामयज्ञ सप्ताह
कीर्तने आणि हरिपाठाने वातावरण भक्तिमय
पोयनाड, ता. १६ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड विभागात नुकताच अखंड नाम यज्ञ सप्ताह झाला. पेझारी-नागोठणे रस्त्यावरील नवेनगर फाट्यासमोरील मैदानात झालेल्या या कार्यक्रमात विविध कीर्तनकारांची कीर्तने, हरिपाठ, काकडा आरती, ज्ञानेश्वरी गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, भजने यासारख्या विविध कार्यक्रमांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सेवा मंडळ पोयनाड विभाग यांनी सप्ताहाचे आयोजन केले होते.
संत प्रतिमा पूजन, वीणा, टाळ-मृदंग पूजन तसेच ध्वजपूजनाने या अखंड नाम यज्ञ सप्ताहाचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जोग महाराज वारकरी प्रशिक्षण संस्था येथील अध्यापक हभप उल्हास महाराज सूर्यवंशी (देवाची आळंदी) यांचे कीर्तन, दुसऱ्या दिवशी भाषाप्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी) यांचे कीर्तन, तिसऱ्या दिवशी संगीत अलंकार प्राप्त हभप गणेश महाराज भगत (पुणे) यांचे कीर्तन संपन्न झाले. तिन्ही कीर्तनकारांनी आपल्याला रसाळ वाणीतून हिंदू धर्म, देशरक्षा, अध्यात्म, समाजातील एकता यांविषयी उपस्थितांना प्रबोधन केले. हभप अमित महाराज म्हात्रे यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. या अखंड नाम यद्य सप्ताहात रायगड भूषण दत्तात्रेय बुवा ओढांगीकर यांची विशेष भजनसेवा संपन्न झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.