ठाण्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

ठाण्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : शहरात सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटवर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन दलालांना अटक करत त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीसह चार पीडित तरुणींची सुटका करण्यात यश आले आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका ठिकाणी दलालांकडून अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना पुरवले जात आहे. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुलीसाठी तब्बल दोन लाखांची मागणी केली जात असल्याचेही समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (ता. १५) सापळा लावून कारवाई केली. एका पुरुष दलालाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून चार पीडितांची सुटका करण्यात आली. चौकशीत एका महिला दलालाचाही सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर तिलाही अटक केली. सुटका केलेल्या तीन तरुणींना संरक्षणासाठी उल्हासनगर येथील शांतीरतन संस्थेत, तर मुलीला बालसुधारगृहात हलविण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com