

पेण येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६चा समारोप उत्साहात
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान; अपघात घटल्याचा दावा
अलिबाग , ता. १६ (वार्ताहर) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेणतर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ उत्साहात पार पडला. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी पोलिस उप अधीक्षक जालिंदर नालकुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पोलिस निरीक्षक संजय ब्राह्मणे, संदीप बागुल आणि वाहतूक विभाग प्रमुख सरिता चव्हाण यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात विष्णू घोडे यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत रायगड जिल्ह्यात अपघातांमध्ये झालेली घट अधोरेखित केली.
कार्यक्रमात इंस्टाग्राम रिल्स, निबंध, चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संजय (अण्णा) साबळे, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील, कालभैरव रेस्क्यू टीम (पोलादपूर) व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांचा गौरव करण्यात आला.
चौकट
रस्ता सुरक्षेत लोकसहभाग निर्णायक
या अभियानामुळे अपघात कमी होण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात आला. स्वयंसेवक, चालक व नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच रस्ता सुरक्षा अधिक प्रभावी होऊ शकते, असे मान्यवरांनी सांगत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.