

वाशी पादचारी पुलावरील लिफ्ट बंद
परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिक संतप्त
वाशी, ता. १६ (बातमीदार) ः वाशी-कोपरखैरणे मुख्य मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वाशी सेक्टर नऊ येथील पादचारी पुलाची सुविधा सध्या नागरिकांसाठी अपुरी ठरत आहे. पुलावरील लिफ्ट बंद अवस्थेत असून परिसरात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पादचारी पुलावर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांच्या सोयीसाठी दोन लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात या लिफ्ट बंद असल्याने नागरिकांना पायऱ्यांवरूनच चढ-उतार करावा लागत आहे.
वाशी परिसरात सेक्टर नऊ ते १४ दरम्यान मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. बाजारपेठ, रेल्वे स्थानक आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा पादचारी पूल नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो; परंतु लिफ्ट बंद असल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय पुलावरील परिसरात कचरा साचलेला दिसून येत असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी दुर्गंधीही जाणवत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाची उभारणी चांगली झाली असली तरी देखभालीअभावी सुविधा निरुपयोगी ठरत आहे. लिफ्ट तातडीने सुरू करून स्वच्छता राखणे आवश्यक आहे. पुलावर नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.