

गटारातील गाळ रस्त्यावरच
मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांचे मनपा स्वच्छता अधिकाऱ्यांना निवेदन
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १९ मधील गटारांतील रस्त्यांसह पदपथावर टाकण्यात आलेला गाळ तातडीने उचण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी बुधवारी (ता. १५) तुर्भे विभाग कार्यालयाचे स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन दिले.
नवी मुंबई शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना, गटारांची सफाई करून काढलेला गाळ रस्त्याच्या कडेला तसेच पदपथावर टाकून ठेवण्यात आला आहे. एक आठवडा उलटला तरी अद्याप हा गाळ उचलण्यात आलेला नसल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष यांनी मनपाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सानपाडा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, कै. सीताराम मास्तर उद्यान, सेक्टर आठ येथील श्री गणपती मंदिर, सेव्हन्थ डेज शाळा, मिलेनियम टॉवर, गुरुद्वारा, वेस्टर्न कॉलेज, सेक्टर पाच येथील गजानन महाराज चौक, हॉटेल गोल्डन पॅलेस, सेक्टर चार छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, दैनंदिन बाजार संकुल येथील परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक परिस्थिती पाहायला मिळत आहे.
दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी येत असून, महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.