नेरूळ–तुर्भे एमआयडीसी मध्ये डेब्रिज डंपिंगवर कारवाई

नेरूळ–तुर्भे एमआयडीसी मध्ये डेब्रिज डंपिंगवर कारवाई
Published on

नेरूळ-तुर्भे एमआयडीसीमध्ये डेब्रिज डम्पिंगवर कारवाई
चार वाहनांवर दंड, १.०५ लाखांची वसुली
वाशी, ता. १६ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या डेब्रिजविरोधी भरारी पथकाने नेरूळ ते तुर्भे एमआयडीसी परिसरात अनधिकृतरीत्या डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली आहे. १० ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान रात्री सापळा रचून तुर्भे एमआयडीसीच्या डोंगराळ भागात एका डम्परवर कारवाई करण्यात आली, तर नेरूळ एमआयडीसी परिसरात अशाच प्रकारे डेब्रिज टाकणाऱ्या दोन डम्परना पकडण्यात आले. तसेच सीबीडी सेक्टर आठमधील वनक्षेत्रात बेकायदेशीर डम्पिंग करणाऱ्या आणखी एका वाहनावरही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत एकूण चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करत एक लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईमुळे अनधिकृत डम्पिंग करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com