

वसईतून गांजा तस्कराला अटक
सात लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नालासोपारा, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा येथे सुटकेसमध्ये विक्रीसाठी आणलेला सात लाख ६६ हजार ८०० रुपयांचा १५ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात पेल्हार पोलिसांनी एकाला अटक केली आहे. वसई न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबईच्या कुर्ला येथील राहणारा देशराज यादव (वय ५१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील एका लॉजसमोर आरोपी बराच वेळ उभा होता. मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत असताना हा आरोपी संशयास्पद आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता १५ किलो गांजा सापडला आहे. हा गांजा कुठून आणला आणि कुठे कुणाला विक्री करणार होता, याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.