उरण आगारात ''एनसीएमसी''ची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध

उरण आगारात ''एनसीएमसी''ची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध
Published on

उरण आगारात ‘एनसीएमसी’ची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध
उरण, ता. १६ (बातमीदार)ः उरण तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मुंबई डिव्हिजनच्या उरण आगारात एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार असून, भविष्यात सवलती मिळविण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रवाशांसाठीही या स्मार्ट कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार आहे. हे कार्ड काढण्यासाठी एकदाच २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार रिचार्जची सुविधा उपलब्ध राहणार आहे. उरण आगारामार्फत राजेश शहा यांच्या महावीर इंटरप्रायझेस, राजपाल नाका येथे अधिकृत प्रतिनिधीमार्फत कार्ड काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आगार प्रशासनाच्या माहितीनुसार कार्ड नसल्यास भविष्यात कोणतीही प्रवासी सवलत मिळणार नाही व पूर्ण भाडे भरावे लागेल. त्यामुळे उरण तालुक्यातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून शासकीय सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com