खोपोलीतून बेपत्ता अल्पवयीन मुली सुरत येथे सापडल्या

खोपोलीतून बेपत्ता अल्पवयीन मुली सुरत येथे सापडल्या
Published on

खोपोलीतून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तिन्ही मुली सुरतमध्ये
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः खोपोली शहरातील क्रांतीनगर येथून बुधवारी (ता. १५) बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली सुरत येथे सापडल्या आहेत. सुरत रेल्वे स्थानकावरून तिन्ही मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे.
अलिफा समशाद शेख (वय १४), सानिया समशाद शेखवय (वय १२) आणि मेजबिन सजाद शेख (वय१२) या तिन्ही मुली क्रांतीनगर येथून घरात कोणालाही सांगता निघून गेल्या होत्या. परिसरात शोधाशोध करूनही मुली आढळून न आल्याने पालकांनी खोपोली पोलिस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी तातडीने तपासाला गती देत सर्व सीसीटीव्ही तपासले. यामध्ये या तिन्ही मुली खोपोली रेल्वे स्थानक येथे दिसून आल्या. त्यानंतर दुपारी लोकलमध्ये मुली बसून गेल्याचे सीसीटीव्ही दिसल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर मुलींचे फोटो आणि माहिती पाठवली होती. या तिघींना सुरत रेल्वे स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतले.

उशिरा माहिती मिळूनही पोलिसांची गती
या तिन्ही मुली मुळच्या उत्तर प्रदेशातील असून, तिथेच मदरशात शिक्षण घेतात. सुट्ट्यांसाठी त्या खोपोलीत आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्या दुपारी १२ वाजता घरातून निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांना याची माहिती संध्याकाळी ७ वाजता देण्यात आली. माहिती मिळण्यास उशीर होऊनही पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी तातडीने सर्व यंत्रणा कामाला लावली. मुली सुरतमध्ये सापडल्यानंतर तिथल्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना सुखरूप स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com