वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र पवार यांची शोकसभा

वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र पवार यांची शोकसभा
Published on

मुंबई, ता. १६ : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे माजी अध्यक्ष, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेते संघाचे माजी सरचिटणीस हरिश्चंद्र पवार (८५) यांचे १२ एप्रिलला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र विक्रेता चळवळीतील एक जिव्हाळ्याचे, कर्तृत्ववान आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने मुंबईतील लोअर परळ येथील ना. म. जोशी शाळेजवळील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजता शोकसभा होणार आहे.
५० वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र विक्री व्यवसायात कार्य करताना पवार यांनी संघटनात्मक पातळीवर मोलाचे योगदान दिले. भायखळा परिसरातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करून मुंबईसह राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मंत्रालयातील बैठका, संघटनांच्या सभा; तसेच जिल्हास्तरीय बैठकींमध्ये ते सक्रिय राहून विक्रेत्यांचे प्रश्न मांडले. त्यांच्या शोकसभेला संघाचे अध्यक्ष तसेच शिवसेना नेते सुभाष देसाई, वृत्तपत्र क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, विविध वृत्तपत्र संस्थांचे प्रतिनिधी, विक्रेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व वृत्तपत्र विक्रेते व संबंधितांनी शोकसभेला उपस्थित राहून पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन विश्वस्त विजय रावराणे, कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर आणि सरचिटणीस संजय चौकेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com