एशियाटिकची निवडणूक नव्याने

एशियाटिकची निवडणूक नव्याने
Published on

एशियाटिकची निवडणूक नव्याने
दोन्ही बाजूंनी सहमती; न्यायालय आज आदेश देणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : एशियाटिक  सोसायटीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करण्याबाबत दोन्ही पक्षकारांनी गुरुवारी (ता. १६) उच्च न्यायालयात सहमती दर्शवली. तसेच नवीन उमेदवारी अर्ज आणि मतदारांच्या छाननीबाबत एक व्यावहारिक आदेश देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे मागील काही महिन्यांपासून वादात अडकलेला निवडणुकीचा मुद्दा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांसह तिघांनी धर्मादाय आयुक्त अमोग कलोतींच्या १३ मार्चच्या आदेशाला आव्हान दिले आहे. या आदेशान्वये निवडणुका पुढे ढकलून आणि उपसमित्यांच्या माध्यमातून पात्र मतदारांची नवी यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. याचिकेवर न्या. फरहान दुभाष यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. संस्थेत सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत सुमारे १,४६७ नवीन सदस्यांची नोंदणी झाली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज गोठवले, छाननी समितीचा कार्यकाळ संपल्यानंतरही नोंदणी सुरू होती. ज्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना या सदस्यांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचा आरोप करून महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी धर्मदाय आयुक्तांच्या आदेशांचे समर्थन केले. तसेच असे अचानक १,४०० सदस्यांची नोंदणी करण्यासाठी ही कामगार संघटना नाही, एशियाटिक सोसायटी असल्याचेही साठे यांनी सांगितले. त्यावर मग नव्याने सदस्य नोंदणी करायची नाही का, अशी विचारणा न्यायालयाने केली. तेव्हा फक्त कायदेशीर मार्गाने म्हणजे पडताळणी समिती छाननी करून याबाबत निर्णय घेऊ शकते, असे साठे यांनी न्यायालयाला सांगितले.
...
...अन्यथा निवडणुका होणार नाहीत!
दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर, तुम्हाला निवडणूक हवी, की १,४०० सदस्यांची नोंदणी, अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच याचिकाकर्ते आणि धर्मदाय आयुक्तांसमोर व्यावहारिक किंवा कायदेशीर मार्गाने असे दोन पर्याय आहेत. जर कायद्यानुसार जाण्याचा मार्ग निवडला तर आम्हाला प्रकरण पुन्हा धर्मदाय आयुक्तांकडे पाठवावे लागेल. त्यांनी दोन महिन्यांनी निर्णय घेतला, मग त्याला पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, हे अविरत सुरू राहील आणि वर्षभर निवडणूक होणार नाही. दुसरा पर्याय हा व्यवहारिक निर्णयाचा असून त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघण्यास मदत होऊ शकते, असे न्यायालयाने सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com