मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रमजीवी संघटनेला रुग्णवाहिका

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रमजीवी संघटनेला  रुग्णवाहिका
Published on

रुग्णसेवेसाठी श्रमजीवीला बळ
मुख्यमंत्र्यांकडून रुग्णवाहिकांचे लोकार्पण
विरार, ता.१७(बातमीदार)ः आदिवासीबहुल तसेच दुर्गम भागांमध्ये आरोग्यसेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर, स्व. लीलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. यापैकी एक रुग्णवाहिका पालघरमधील श्रमजीवी संघटनेला देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी श्रमजीवी संघटनेने वर्षानुवर्षे केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत रुग्णवाहिका देण्यात आली. तसेच नंदुरबार येथील शांताई ट्रस्ट, चंद्रपूर-गडचिरोली येथील द रिसर्च ऑर्गनायझेशन, पालघर येथील श्रमजीवी संघटना, शहापूर, नॅशनल पार्क परिसरातील आदिवासी पाडे तसेच रायगड जिल्ह्यातील कालकाई सामाजिक संस्थांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित, भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर, रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रवीण दरेकर, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com