सूर्यफुलापासून शुद्ध खाद्यतेलाची निर्मिती...

सूर्यफुलापासून शुद्ध खाद्यतेलाची निर्मिती...
Published on

भेसळयुक्त तेलाकडे पाठ
सूर्यफुलाच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल
वाणगाव, ता.१५ (बातमीदार): शुद्ध तेलाला बाजारात मागणी असल्याने शेतकरी सुर्यफुलाची लागवड करत आहे. त्यामुळे सुर्यफुलाची शेती एकीकडे नफ्याची ठरत आहे. तर दुसरीकडे बाजारात येणाऱ्या भेसळयुक्त तेलाकडे पाठ फिरवून घरगुती तेल निर्मितीला वेग आला आहे.
शुद्ध खाद्यतेल, उत्पादन, पेंड आणि मधमाशांना आकर्षित करणारे पिक असल्याने मधाचे उत्पादनही वाढत आहे. वर्षभर घरगुती तेलाची गरज भागवण्यासाठी डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड ठिकाणी रब्बी आणि उन्हाळी सूर्यफुलाची शेती बहरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्येच सूर्यफुलाची लागवड केलेली असून सद्यःस्थितीत फुले परिपक्व झाली आहेत. त्यामुळे बी वेगळी करून तेल निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने सूर्यफुलाची लागवड करून खाद्यतेलाची निर्मिती केली जात असल्याचे वाडा येथील शेतकरी कोंडू पष्टे यांनी सांगितले.
--------------------
चोथ्याचा खतासाठी वापर
पालघर जिल्ह्यात चारोटी, वाडा, मनोर येथे सूर्यफुलापासून तेलाची निर्मिती करण्यासाठीचे घाणे आहेत. सूर्यफुलाच्या फुलांची तोडणी करून त्यातील बिया काढून त्यातील तेल काढणाऱ्या घाण्याद्वारे गाळले जाते. गाळलेल्या चोथ्याचा (पेंडीचा) उपयोग शेतीला खतासाठी करता येतो, तसेच जनावरांना खाद्य म्हणून वापरण्यात येते. बियांमध्ये ३५ ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com