मच्छीमारांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी उपाययोजना करा

मच्छीमारांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी उपाययोजना करा
Published on

मच्छीमारांच्या उपजीविकेचे रक्षण करा
खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन
कासा, ता.१७ (बातमीदार)ः पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मच्छीमार व नागरिकांच्या हितरक्षणासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत , डहाणू उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत उपस्थित होते. वाढवण बंदरामुळे मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेवर तसेच सागरी पर्यावरणावर प्रतिकूल परिणामची भीती आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्याची मागणी खा. सवरा यांनी केली. तसेच मच्छीमारांच्या नौकांचे आधुनिकीकरण, सुरक्षित नेव्हिगेशन, संप्रेषण यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज किंवा अनुदान द्यावे, तसेच कोल्ड स्टोरेज सुविधा व सोलर प्रणालीसाठी मदत करावी, अशी मागणी केली केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com