अंबरनाथमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला

अंबरनाथमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला
Published on

स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा

अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावी २००२-०३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल दोन दशकांनंतर आपल्या शाळेत पुन्हा एकत्र येण्याचा योग आल्याने वातावरण भावनिक आणि आनंददायी झालेले पाहायला मिळाले. या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील किस्से, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील अनुभव सांगितले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीत शाळा व शिक्षकांचे असलेले महत्त्व अधोरेखित करत कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. शाळेचे नूतनीकरण, ग्रंथालयाचे अद्ययावतीकरण, मैदानाची पुनर्रचना आणि आधुनिक भौतिक सुविधा उभारण्यात माजी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शाळेची वेबसाईट लवकरच सुरू करण्यात येणार असून, ९० वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच शाळेला गरज भासल्यास तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या मेळाव्यास राजेश रोहिदास, तुषार सोनजे, माजी मुख्याध्यापिका सुलोचना वीर, नयना गुळीक, माजी शिक्षक मोहन कुमावत, नम्रता मणेर यांच्यासह एकूण २१ शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच १२५ माजी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान केला. जुन्या आठवणी, हास्य आणि भावनांनी ओथंबलेला हा स्नेहमेळावा पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत उत्साहात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com