वसईची अनोखी परंपरा २१ वर्षानंतर मेलबर्न मध्ये कायम

वसईची अनोखी परंपरा २१ वर्षानंतर मेलबर्न मध्ये कायम
Published on

वसईकरांचा इस्टर मेलबर्नमध्ये
२१ वर्षांची पंरपरा, मेळाव्यातून एकोप्याचा संदेश
विरार, ता.१७ (बातमीदार)ः नोकरीनिमित्त, उच्चशिक्षणाशाठी वसईतील अनेक बांधव परदेशात स्थायिक झाले आहेत. पण मोबाईल, इंटरनेटच्या काळात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी घरच्यांशी संपर्कात आहेत. याचीच प्रचिती २१ वर्षापासून मेलबर्नमध्ये होणाऱ्या इस्टर मेळाव्यातून येत असून सांस्कृतिक वारसा मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी वसईकर उत्साहाने एकत्र येत आहेत.
मेलबर्नमधील वसईकर चैत्र पालवी आणि इस्टरच्या आनंदाचे औचित्य साधत इस्टर मेळावा करत आहेत. यंदाही रविवारी झालेल्या कार्यक्रमात २०० हून अधिक वसईकर सहभागी झाले.
---------------------------
मनोरंजनाची पर्वणी
धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या विषयावर सूत्रसंचालक शीला परेरा, जूड फर्नांडीस यांनी डॉ. रेमिया फरेरा यांची मुलाखत घेतली. तर त्यानंतर दीप्ती डिमेलो यांनी ‘तेतेलेस्ताय’ या कवितासंग्रहाचे सुरेख विश्लेषण केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रिया वर्तकच्या गायनाबरोबर ॲशलीन डायस, गॅरी कार्व्हालो यांनी सादर केलेल्या वसईतील पारंपरिक गीतांवर सर्वांनी ठेका धरला.
-------------------------
सोहळ्याचे स्वरूप
सुरुवातीला वसईच्या परंपरा, जीवनमान, पारंपरिक कथांवर बसवलेल्या नाटुक्याल्यांच्या सादरीकरणाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाला एका सोहळ्याचे स्वरूप आले आहे. केवळ भेटीगाठींचे माध्यमापुरते मर्यादीत न राहता, लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृती, बोलीभाषेचे संवर्धनाचे केंद्र बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com