

‘ध्यान आणि प्राणायाम कार्यशाळे’ला सफाई कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
कल्याण, ता. १७ ( वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या शासकीय कार्यक्रम विभागाच्या मदतीने ‘ध्यान आणि प्राणायाम कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ध्यान आणि प्राणायाम कार्यशाळेमुळे कर्मचारी यांना कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार असून, कार्यशाळेचा लाभ हा जास्तीत जास्त सफाई कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यामार्फत उपस्थित कर्मचारीवर्गास करण्यात आले.
ही कार्यशाळा १०० कर्मचारी यांची एक बॅच याप्रमाणे एकूण ६ बॅचमध्ये पुर्ण करण्यात येणार असून, कार्यशाळेचा कालावधी एकूण ५ दिवसाचा असणार आहे. कार्यशाळेचा शुभारंभ महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी गुरुवारी (ता. १६ ) महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला असून, ते रविवार (ता. २६) पर्यंत चालणार आहे. या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता तथा समन्वयक व प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हींग रोहिणी लोकरे यांच्यासह संस्थेचे इतर प्रशिक्षक निहार भोसले, उन्मेश मसूरकर, अस्मिता गुप्ते, उमा आवटे पुजारी इत्यादी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.