तिकिटासाठी खेळण्याची नोट देऊन एनएमएमटी बस वाहकांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस

तिकिटासाठी खेळण्याची नोट देऊन एनएमएमटी  बस वाहकांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस
Published on

तिकिटासाठी खेळण्यांच्या नोटा
प्रवाशांकडून एनएमएमटी वाहकाची फसवणूक
खारघर, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महपालिका परिवहन बस सेवेत प्रवाशाने तिकिटासाठी खेळण्यांच्या नोटा देऊन वाहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे बसवाहकांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, प्रवाशांवर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. खारघर रेल्वे स्थानकांवरून तळोजा वसाहतीत जाणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
बससेवा ही केवळ वाहतूक नसून सेवा-ग्राहक या नात्यावर चालणारी व्यवस्था आहे, परंतु खारघर रेल्वे स्थानकांवरून तळोजा वसाहतीत जाणाऱ्या बसमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सायंकाळच्या वेळेस बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत वाहकांकडून नोटा तपासल्या जात नसल्याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे समोर आले आहे. तिकिटासाठी प्रवाशाने मनोरंजन बॅंक ऑफ इंडियाची नोट दिली आहे. दिवसाअखेरीस हिशोब करताना या बनावट नोटा लक्षात आल्या असून, त्यामुळे संबंधित वाहकाला खिशातून पैसे भरावे लागले. यामुळे वाहकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रामाणिकपणे व्यवहार करून सार्वजनिक सेवांचा गैरवापर टाळावा, असे बसचालकाकडून आवाहन केले आहे.

ऑनलाइन पेमेंटमध्येही स्कॅम
यासंदर्भात काही बसवाहकांशी संपर्क केला असता, तिकिटासाठी रोख आणि ऑनलाइन पैसे स्वीकारले जातात. ऑनलाइनसाठी बसवाहक प्रवशांना स्कॅनर देतात, परंतु अनेक वेळा काही प्रवासी मोबाईलवरील जुना स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करतात. दिवसाअखेरीस हिशोब करताना हे लक्षात येत असल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागतो. या प्रकारांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रवाशांकडून पैसे स्वीकारताना अधिक सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संशयास्पद नोटा आढळल्यास तत्काळ वरिष्ठांना कळवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com