वज्रेश्वरी यात्रेत परंपरा जपत दोनशे बैलगाड्या घेउन घोटीतील भाविक दाखल

वज्रेश्वरी यात्रेत परंपरा जपत दोनशे बैलगाड्या घेउन घोटीतील भाविक दाखल
Published on

वज्रेश्वरी यात्रेत परंपरेनुसार बैलगाड्या घेऊन घोटीतील भाविक दाखल

वज्रेश्वरी, ता. १७ (बातमीदार) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या पालखी उत्सवाला प्रारंभ झाला असून, शुक्रवार (ता. १७) पासून पुढील तीन दिवस हा सोहळा पार पडणार आहे. आगरी, कोळी, भंडारी आदी समाजांची कुलस्वामिनी असलेल्या या देवस्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. इगतपुरी तालुक्यातून दरवर्षी सजविलेल्या बैलगाड्यांचा सहभाग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात तानसा नदीच्या काठी वज्रेश्वरी देवीचे हे पुरातन देवस्थान आहे. पेशवेकालीन चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांवरील विजयानंतर १७३९ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. चैत्र अमावस्येपासून पुढील तीन दिवस येथे यात्रा भरते. मंदिरात परशुरामाची मूर्तीही असून, या कालावधीत परशुराम जयंती उत्सव साजरा केला जातो. भंडारी, आगरी, कोळी व पानमाळी समाजाची कुलस्वामिनी असल्याने ठाणे, भिवंडी, सफाळे, पालघर, वसई आदी भागांतून मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होतात. गुरुवारी महापूजा, तर शुक्रवारी अमावस्येला चिमाजी आप्पा यांच्या विजयानंतर उभारलेल्या विजयस्तंभावर दिवा लावून पूजन केले जाते. या दिवशी नवस फेडण्याची प्रथा आहे. पूर्वी विजेची सोय नसताना दीपमाळेवरील दिव्याचा प्रकाश गाभाऱ्यातील मूर्तीवर पडत असल्याची माहिती भाविकांनी दिली.
----------------
२०० बैलगाड्या दाखल
नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे २०० बैलगाड्या या उत्सवासाठी येतात आणि यंदाही त्यांचे आगमन उत्साहात झाले आहे. परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नांदगाव सदो (इगतपुरी) येथील गजानन भागडे यांनी सांगितले. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होत असल्याची माहिती माजी मुख्य पुरोहित हेमंत लेले यांनी दिली. यात्रेत आकाशपाळणे, विविध खेळ, साहसी खेळ तसेच मिठाई, खाऊ व खेळण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर उभारली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com