

वसई विकास सहकारी बँकेचा निधीवाटप
विरार (बातमीदार) ः वसई विकास सहकारी बँकेचा धर्मदाय निधीवाटप कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमात तीन संस्थांना धर्मदाय फंडातून मदत देण्यात आली. या वेळी वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन आशा राऊत यांनी आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या कामगिरीचा आढावा घेतला. बँकेच्या ठेवीस साधारणतः १,६७० कोटी असून कर्जवितरण ७७७ कोटी इतके आहे. तसेच बँकेचे खेळते भांडवल १,९७५ कोटी असून स्वनिधी २६५ कोटी इतका आहे. तसेच बँकेने विविध संस्थांना सुमारे ८२ लाखांची मदत केलेली असून सहकार क्षेत्रात बँकिंग व्यवसाय करताना समाजातील तळागाळातील लोकांना बचतीची सवय लावून, आर्थिक गरजांची पूर्तता केल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.