

श्रमाची किंमत कवडीमोल
रोजगार हमी योजनेची मजुरी जैसे थे
जव्हार, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यात पावसाळी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पोट भरण्याची सोय होते; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांसाठी रोजगार हमी योजना महत्त्वाचा आधार ठरते; मात्र यंदा रोजगार हमी योजनेची मजुरी अत्यल्पच असल्याने श्रमाची किंमत कवडीमोल ठरली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीच्या दरात एप्रिलमध्ये वाढ केली जाते. योजनेच्या अंमलबजावणीपासून ही परंपरा कायम होती; मात्र यंदा प्रथमच दरवाढ झाली नाही. यामुळे तालुक्यातील हजारो मजुरांचा भ्रमनिरास झाला आहे. सद्य:स्थितीत मनरेगामध्ये काम करणाऱ्या मजुरांना ३१२ रुपये रोज दिला जातो. तर शेतशिवारात काम करणाऱ्या मजुरांना मेहनतीच्या कामासाठी ४०० ते ६०० रुपयांचा रोज मिळतो. शासकीय मजुरीपेक्षा हा रोज अधिक आहे. अशा परिस्थितीत मजुरांच्या मजुरीत दरवाढ होईल, अशी अपेक्षा मनरेगाचे काम करणाऱ्या मजुरांना होती; मात्र १ एप्रिलला मजुरीच्या दरवाढीची घोषणा झाली नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
--------------------------
विकासकामांवर परिणाम
- मनरेगाच्या मजूर दरावर शेतशिवारातील दरवाढीचा आकडा ठरतो. यंदा दरवाढ झाली नसल्याने याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता आहे.
- केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडे मनरेगाच्या मजुरीचे दर ठरविण्याचा अधिकार आहे. ही दरवाढ महागाईच्या निर्देशांकानुसार केली जाते. दरवर्षी १ एप्रिलला मजुरीचे नवीन दर जाहीर होतात.
-----------------
वर्ष मिळणारी मजुरी
२००६-२००७ ६५ रुपये
२०१०-२०११ १०० रुपये
२०१५- २०१६ १८१ रुपये
२०२०-२०२१ २३८ रुपये
२०२५-२०२६ ३१२ रुपये
२०२६-२०२७ ३१२ रुपये
-------------------------
कोट
माझे कुटुंब अल्पभूधारक शेतकरीवर्गात मोडते. त्यामुळे शेतीकामातून मिळणारी मजुरी पावसाळ्यातच उपलब्ध असते; मात्र रोजगार हमी योजनेच्या कामातून पगार मिळत असल्याने मोठा आधार होता.
- प्रमिला महाले, रोहयो मजूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.