मान्सूनपूर्व कामासाठी ३१ मे डेडलाईन

मान्सूनपूर्व कामासाठी ३१ मे डेडलाईन
Published on

मॉन्सूनपूर्व कामासाठी ३१ मे डेडलाइन
ठाणे महापालिका आयुक्तांचे स्पष्ट आदेश

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १७ ः पावसाळ्यापूर्वी शहरात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली असून नालेसफाई, खड्डे दुरुस्ती, सखल भागांवरील उपाययोजना आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच घोडबंदर रोड फेरीवालामुक्त करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधण्यावरही त्यांनी भर दिला.

नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या. नालेसफाई, गटार स्वच्छता, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, स्ट्रीट लाइट दुरुस्ती आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. रेल्वे कलव्हर्टची सफाई नालेसफाईसोबत समांतर करण्यास सांगण्यात आले.
घोडबंदर रोडसह माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर दररोज कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मॉन्सून संपेपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला.


------------
मनुष्यबळ सज्ज ठेवा
रस्त्यांच्या कामांबाबत एमएमआरडीए, मेट्रो आणि अन्य यंत्रणांशी समन्वय साधून ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करावीत, अन्यथा बांधकाम साहित्य हटवून रस्ते मोकळे करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. खड्ड्यांच्या तक्रारींवर तातडीने कारवाईसाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले. शहरातील सखल भागांची स्वतंत्र यादी तयार करून तेथे पंपिंग यंत्रणा, हायड्रा आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्यास सांगितले.
------------------
कंट्रोल रूम सुरू करण्याच्या सूचना
हरित कचरा तत्काळ उचलण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. उघड्या केबल्स व स्ट्रीट खांबांची तपासणी, तसेच नालेसफाईदरम्यान संबंधित विभागांशी समन्वय राखण्याचे आदेश दिले. मॉन्सून काळात नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करून प्रभागनिहाय कंट्रोल रूम सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व अधिकारी सतर्क राहून नागरिकांना दिलासा मिळेल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com