

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : महापालिकेच्या महासभा सभागृहात बुधवारी (ता. १५) गटनेत्यांकडून महापौरांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या स्थायी समिती सदस्यांची नावे गुरुवारी (ता. १६) नगरसचिव विभागाने प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे या नावांमध्ये भाजपतून महापौर निवडणुकीत बंडखोरी करणारे सुहास नकाते यांच्या नावाचा समावेश आहे, तर प्रथमच १६ पैकी सात सदस्य या महिला आहेत.
नगरसचिव विभागाने जाहीर केलेल्या यादीत काँग्रेसकडून अन्सारी रेश्मा बानो वसीम अहमद, अन्सारी जोहा असरार, अन्सारी शबाना, विजय भगवान भगत, अन्सारी साजिद हुसैन, भाजपकडून शेट्टी संतोष मंजय्या, पाटील सुमित पुरुषोत्तम, नकाते सुहास जालिंदर, गीता विठोबा नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या बहाऊद्दीन फराज फजल, खान ईशा इमरान, शिवसेनेकडून नाईक अस्मिता प्रभुदास, खान साबिया दीन मोहम्मद, समाजवादी पक्षाकडून खान अमन ओबैद, कोणार्क विकास आघाडीचे मयूरेश विलास पाटील आणि भिवंडी विकास आघाडीकडून जावेद गुलाम मोहम्मद दळवी यांचा समावेश स्थायी समितीमध्ये असणार आहे.
विशेष म्हणजे २० फेब्रुवारीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सहा नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. यामध्ये नारायण चौधरी आणि सुहास नकाते यांचासुद्धा समावेश होता. त्यामुळे भाजपच्या या खेळीची पुन्हा एकदा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.