वाहतूक कोंडीमुक्त शहरासाठी महापौरांचा पुढाकार

वाहतूक कोंडीमुक्त शहरासाठी महापौरांचा पुढाकार
Published on

कोंडीमुक्त भाईंदरसाठी महापौरांचा पुढाकार
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी पोलिस विभाग, महापालिकेची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वाहतूक कोंडी, बेवारस वाहने, अनधिकृत पार्किंगसारख्या प्रमुख मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
शहरात दररोज वाढणारी वाहने, रस्त्यावर होत असलेली फेरीवाल्यांची अतिक्रमणे, पार्किंग, नो पार्किंग धोरणाची प्रभावी होत नसलेली अंमलबजावणी, पार्किंग क्षेत्राचा अभावामुळे नागरिकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांवर त्याचप्रमाणे अनधिकृतरीत्या पार्किंग करणाऱ्या जड व अवजड वाहनांवर तसेच शहरातील व शहराच्या बाहेरून येऊन पार्किंग केलेल्या बसवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. तसेच सात नव्या ठिकाणी सिग्नल उभारणे, पे अँड पार्क योजनेसाठी पालिकेकडून जागा उपलब्ध करून देणे, काशी मिरा येथील ऑक्ट्रॉय नाक्याची जागा पार्किंगसाठी वापरणेबाबत निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com