

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांतून दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. नारपोली पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार, सारंगगाव परिसरातील ३७ वर्षीय महिलेची १५ वर्षांची मुलगी मंगळवारी (ता. १४) मानकोली परिसरात कामासाठी गेली होती. या दरम्यान तिच्या पोटात दुखू लागल्याने ती घरी परतण्यासाठी निघाली, पण परत घरी आली नाही. तिचा शोध लागला नाही. त्यामुळे तिला फसवून पळवून नेले असावे, असा कुटुंबीयांना संशय आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील भायखळा परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने आपल्या १६ वर्षीय मुलीला काही दिवसांसाठी शहरातील जैतनपुरा येथील तिच्या माहेरी ठेवले होते. ७ एप्रिलच्या रात्री ती काही कारणावरून नाराज होऊन रागाच्या भरात घरातून निघून गेली. यानंतर ती परत आली नाही. शोधाशोध करूनही तिचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी भिवंडी शहर पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.