उन्हाळी विज्ञान शिबिराचे आयोजन

उन्हाळी विज्ञान शिबिराचे आयोजन
Published on

उन्हाळी विज्ञान शिबिराचे आयोजन
विज्ञानाची गोडीसाठी विविध उपक्रमांची मेजवानी
जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात मराठी विज्ञान परिषद आणि विद्याभवन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आज, शनिवार आणि रविवारी (ता. १८,१९) दोन दिवसीय उन्हाळी विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान अधिक सुलभ करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध ज्ञानवर्धक आणि मनोरंजक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. खगोलशास्त्राची ओळख, समग्र आरोग्य जीवनशैली, गणितातील गमती-जमती, प्रश्नमंजुषा, खेळातून विज्ञान, विज्ञान चित्रपट, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान कथालेखन, कथाकथन, वैज्ञानिक दृष्टिकोन, नायट्रोजन शो, वनस्पतींची ओळख, प्रयोगातून विज्ञान संकल्पना, नागरी संरक्षण व प्रथमोपचार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना कृतीप्रधान मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरात विज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नेहरू तारांगण संचालक डॉ. अरविंद परांजपे, तसेच डॉ. नीलिमा जोशी, संगीता सराफ, शशिकांत धारणे, डॉ. पूनम हुद्दार, गौरी देशपांडे, डॉ. मानसी राजाध्यक्ष, विनय दिनकर, अल्पना कुलकर्णी, डॉ. सुरेश भागवत, सुनील सुळे आणि पद्मश्री डॉ. शरद काळे यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
या शिबिरासाठी माध्यमिक स्तरावरील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नोंदणी केली आहे. त्यामुळे शिबिराबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com