

धनानीनगरमध्ये पोलिस बंदोबस्त
बोईसर (वार्ताहर) : येथील धनानीनगर परिसरातील जुन्या सर्वे क्र. ६१/१/१ व नवीन सर्वे क्र. ३१/१ मधील जमीन वाद प्रकरणात आज एका दाव्याचा निकाल लागल्यानंतर संबंधित जमीन मालकांकडे ताबा देण्याची प्रक्रिया पार पडली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.